कधी तू चम चम करणारी चांदण्या
कधी तू कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरा
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात ||धृ||
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्या
कधी तू अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात (२)
कधी तू हिरव्या चफ्याच्या पाकळ्या
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरा
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्या ||१||
जरी तू कळले तरी न कळणारी
दिसले तरी ना दिसणारी विरणारे मृगजळ एक क्षणात (२)
कधी तू मिटलेल्या माझ्या पापण्या
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरा
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्या ||२||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा